कार्डिएक अरेस्ट आणि हार्ट अटॅक ही एकाच आजाराची दोन नावे आहेत का?
तुम्हाला हे माहीत आहे का की कार्डिएक अरेस्ट झालेल्या व्यक्तीच्या बाबतीत जर योग्य व वेळेवर कृती केली तर त्याचे प्राण वाचू शकतात?
तुम्ही कार्डिओपल्मनरी रीसुसिटेशन (सीपीआर) बद्दल ऐकले आहे का?
तुम्हाला सीपीआरचे तंत्र/ पद्धत माहीत आहे का?
तुम्हाला कोणतेही सीपीआर प्रशिक्षण मिळाले आहे का?
जर एखाद्या सामान्य माणसाला सीपीआरचे प्रशिक्षण देण्यात आले तर तो सीपीआर करू शकेल का?
तुम्हाला हे माहीत आहे का की 'कम्प्रेशन ओन्ली लाइफ सपोर्ट (सीओएलएस) सीपीआर' करता येते?
प्रौढांमध्ये, 'कम्प्रेशन ओन्ली लाइफ सपोर्ट (सीओएलएस)' सीपीआर करताना छातीच्या हाडाचा खालच्या बाजूचा एक तृतीयांश भाग , प्रति मिनिट १२० वेळा या वेगाने ५-६ सेंमी खोलवर दाबावा लागतो.
कोणीही सीपीआर करू शकतो.कोणीही एखाद्याचे प्राण वाचवू शकतो.
जर तुम्हाला सीपीआर शिकून घ्यायचे असेल तर कृपया आयआरसी शी संपर्क साधा आणि तुम्हाला जवळच्या प्रशिक्षण केंद्रात/ प्रशिक्षकाकडे पाठवले जाईल. (https://cprindia.in/) or Visit (https://imagicahealth.live/learncpr/) सीपीआरबद्दल अधिक माहितीसाठी येथे भेट द्या :